“थॅंक यू अवर हीरोज’क्रोएशियन प्रसारमाध्यमांकडून प्रशंसेचा वर्षाव

झाग्रेब: फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सकडून पराभ” पत्करावा लागल्याने क्रोएशियाचे विश्‍वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. परंतु जेमतेम 40 लाख लोकसंख्येच्या या देशाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारताना केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे क्रोएशियातील समस्त नागरिक भारावून गेले आहेत.

इतकेच नव्हे तर क्रोएशिया नप्रसार माध्यमांनीही अंतिम फेरीतील पराभवाचा कोठेही उल्लेख न करता उपविजेतेपद पटकावणाऱ्या क्रोएशियन संघाला उद्देशून “थॅंक डू अवर हीरोज’ असे मथळे दिले आहेत. क्रोएशियाने उपान्त्य लढतीत विजेतेपदाचा दावेदार असलेल्या इंग्लंडचा 2-1 ने पराभव करताना विश्‍वचषक स्पर्धेतील सर्वाधिक सनसनाटी निकालासह अंतिम पेरी गाठली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रोएशियाने पहिल्यांदाच फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असल्यामुळे खेळाडू आणि पाठीराख्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

आता अंतिम सामना गमावल्यावर निराशा झालेल्या क्रोएशियाच्या पाठीाख्यांची ती निराशाही अल्पकाळच टिकली. विश्‍वचषक स्पर्धेत संस्मरणीय उपविजेतेपद पटकावणाऱ्या संघाच्या स्वागतासाठी आनंदोत्सवाची तयारी संपूर्ण क्रोएशियात सुरू झाली आहे. “स्पोर्टस्क नोव्होस्ती’ या क्रोएशियातील अग्रगण्य क्रीडा नियतकालिकाने “थॅंक यू हीरोज’ असा पहिल्या पानावर मथळा दिला असून “तुम्ही आमच्या अभिमानाचे स्थान आहात. तुम्ही आम्हाला सर्व काही दिले आहे. तुमचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल’, असे बातमीत म्हटले आहे.

अत्यंत प्रतिष्ठेचे “गोल्डन बॉल’पारितोषिक पटकावणाऱ्या लुका मॉड्रिकचे मोठे छायाचित्रही “स्पोर्टस्क नोव्होस्ती’ने पहिल्या पानावर छापले असून मॉड्रिक हा आमचा मानबिंदू असल्याचे म्हटले आहे. “ब्रेव्ह हार्टस, तुम्ही आमची मान आपल्या कर्तृत्वाने उंचावली आहे’, असा मथळा “जुटार्नजी लिस्ट’ हा प्रमुख दैनिकाने दिला असून “संपूर्ण क्रोएशिया तुमच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे. तुम्हीच आमच्या देशाचे खरे सोने आहात’, अशा शब्दांत व्हेसेरनजी लिस्ट या आणखी एका प्रमुख नियतकालिकाने देशातील फुटबॉलशौकिनांच्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

क्रोएशियन फुटबॉल संघाने गेल्या महिनाभरातील आपल्या कामगिरीमुळे जगभरात क्रोएशियाला मानाचे स्थान मिळवून दिले आहे, असे सांगून व्हेसेरनजी लिस्टने म्हटले आहे की, युरोपियन युनियनमध्ये सर्वात वाईट अवस्थेतील अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशातील नागरिकांची तुमच्या सोनेरी कामगिरीमुळे उच्च स्तरावर राहिली आहे. तुमच्या इंग्लंडवरील ऐतिहासिक विजयाचा आम्हाला अभिमान वाटत असून काही वेळा पराभवापेक्षाही आपण केलेल्या कामगिरीला अधिक महत्त्व प्राप्त होत असते.

क्रोएशियन संघाच्या स्वागतासाठी संपूर्ण क्रोएशियात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र फटाके वाजवले जात होते, नागरिक एकमेकांची गळाभेट घेत होते, देशभरात नुसता जल्लोषच सुरू होता. यावेळी हजारो चाहते झाग्रेबच्या प्रसिद्ध फॅन झोनमध्ये एकत्र येऊन विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. हजारो फुटबॉलशौकीन आपल्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवताना रस्तोरस्ती आनंदोत्सव साजरा करत होते. अनेक चाहत्यांच्या चेहऱ्यावर देशाचा राष्ट्रध्वज रंगवलेला होता.

अनेक चाहते कॅफे आणि स्पोर्टसबारमध्ये जमून जल्लोष करताना दिसून येत होते.काही चाहते विजयोत्सवाचे “प्ले माय क्रोएशिया, व्हेन आय सी यू, माय हार्ट इज ऑन फायर’ हे लोकप्रिय गीत गात होते. तसेच हॉटेलमधील वेटर, दुकानदार तसेच टीव्ही अँकर्स, नर्सेस लाल आणि पांढऱ्या रंगाच्या जर्सी घालून आनंदोत्सव साजरा करीत होते.स्थानिक वृत्तवाहिन्यांचे निवेदकही क्रोएशियाच्या संघाची प्रशंसा करताना थकत नव्हते. आमचा संघ म्हणजे सिंहांचा संघ आहे अशा शब्दांत वृत्तवाहिन्यांनी क्रोएशियाच्या विजयी वीरांचे कौतुक केले. दरम्यान अंतिम सामन्यानंर विजेत्या फ्रान्सच्या खेळाडूंचे अभिनंदन करणाऱ्या क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)