मुंबई- बिग बॉस 13चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. ह्रदयविकाराच्या धकक्याने सिद्धार्थचं निधन झालं अशी प्राथमिक माहिती आहे. अनेक मालिकांमाध्यमातून सिद्धार्थने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. छोट्या पडद्यावरचा मोठा कलाकार अशी त्याची ओळख होती. अतिशय संवेदनशील असलेल्या सिद्धार्थची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
24 ऑगस्टला त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना (फ्रंटलाईन वर्कर्स) धन्यवाद मानले होते. कोरोनाच्या काळात अनेक अत्यावश्यक सेवेत काम करण्याऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अनेकांना मदत केली. त्याचे आभार मानणारी ही पोस्ट आहे. हिच पोस्ट त्याची शेवटची पोस्ट ठरली.
पोस्टमधे नेमकं काय लिहिलंय?
फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणे सोपे नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो.
View this post on Instagram
टी.व्ही सीरियल बालिका वधूमधून सिद्धार्थ घराघरात पोहचला. तिच सीरियल त्यांच्या आयुष्याला वेगळ वळण देऊन गेली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. बिग बॉसचं तेरावं पर्व त्याने चांगलंच गाजवलं होतं. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.