आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार-इस्रो

नवी दिल्ली : अंतराळ संशोधन संस्था इस्रोची आणि भारताची ऐतिहासिक चांद्रयान-2 ही मोहिम अगदी शेवटच्या क्षणी यशस्वी होण्यात अपयशी ठरली. परंतू, मागील काही दिवसांपासून विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचा इस्रोकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहे. इस्रोला मदत करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाही पुढे सरसावली होती. विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्यासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे. अशातच इस्रोने ट्विट करत आपल्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले आहेत.

विक्रम लॅंडरच्या सॉफ्ट लॅंडिंगदरम्यान अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर त्याचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोकडून सतत विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.चांद्रयान 2 या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील विक्रम लॅंडर हे 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा जमिनीवरील कंट्रोल रूमशी संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोकडून पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु गेल्या दहा दिवसापासून संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यानंतर नासाही इस्रोच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. परंतु नासाकडून अद्यापही कोणती माहिती देण्यात आली नाही. याचदरम्यान इस्रोने एक ट्विट केले आहे. आमच्या पाठिशी खंबिरपणे उभे राहिल्याबद्दल सर्व भारतीयांचे मनापासून आभार… तसेच आम्ही आमचे प्रयत्न करत राहु आणि पुढे जाण्याचाही प्रयत्न करू असे इस्रोने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)