ठाण्यात स्नॅक्‍स कंपनीच्या गोदामाला मोठी आग

ठाणे – ठाण्यात एका स्नॅक्‍स उत्पादक कंपनीच्या गोदामाला आज पहाटे मोठी आग लागून त्यात कंपनीच्या 12 मालवाहू गाड्याही जळून खाक झाल्या. तथापि त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमाराला ही आग लागल्याचे सांगण्यात येते.

कंपनीचे हे गोदाम मानपाडा येथे आहे. आगीत ते पुर्ण जळून खाक झाले. आग नेमकी कशाने लागली हे लगेच समजू शकले नाही. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तेथे मोठ्या प्रमाणात तैनात कराव्या लागल्या. आगीचे स्वरूप भीषण असल्याने ती आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठे प्रयत्न करावे लागले.

आता ती आग विझली असली तरी तेथे निर्माण झालेली धग अजून कमी झालेली नाही. ती कमी होण्यासाठी काही तासांचा अवधी लागेल असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीत झालेल्या आर्थिक नुकसानीचाहीं पंचनामा केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.