करोना उपचारानंतर घरी येताच लागली 5 कोटींची लाॅटरी; ठाण्यातील व्यायवसायिक ‘मालामाल’

ठाणे – करोनाच्या संकटकाळात अनेकजण आर्थिकदृष्या खिळखिळे झाले आहेत. अशातच ठाण्यातील एका व्यावसायिकाला करोना उपचारानंतर बरे होऊन घरी येताच पाच कोटींची लाॅटरी लागली आहे. राजकांत पाटील असे व्यावसायिकाचे नाव असून त्यांना डियर लाॅटरीज बैसाखी बंपर 2021 ड्राॅ जिंकत 5 कोटी रुपये मिळाले आहेत.

“मला स्वत:ला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. यातून पूर्णपणे बरा झाल्यावर, जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मला डियर लॉटरीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याविषयी एक मेसेज आला. काही कारणास्तव मी जरा गोंधळलो कारण मी कित्येक दिवस आजारी होतो आणि हा मेसेज नेमका कशा संदर्भात आहे ते मला कळत नव्हते. पण अखेर मी त्यांच्याशी संपर्क साधला.

नमस्कार पाटील साहेब. तुम्ही डियर लॉटरी टीमच्या इतर 25 सदस्यांसह कॉन्फरन्स कॉलवर आहात आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही 5 कोटी रुपये जिंकलेले आहात’ असं त्यांनी फोनवर सांगताच काही क्षण मी गांगरलो आणि हे खरंच घडलं आहे याची जाणीव झाल्यावर आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते” अशी प्रतिक्रिया डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 चे मानकरी ठरलेल्या राजकांत पाटील यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.