दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती थायलंडमध्ये

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान आहे. दगडूशेठ गणपती केवळ पुणेकरांपुरता मर्यादित नाही. तर परदेशवासीयांचा देखील लाडका बाप्पा आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना देखील बाप्पाचे दर्शन घेण्याची एक खास ओढ असते. आता दगडूशेठच्या बाप्पाचे दर्शन थेट थायलंडच्या भक्‍तांना घेता येणार आहे. थायलंडमधील मंदिरात हुबेहूब दगडूशेठच्या बाप्पांसारखी मूर्ती विराजमान होणार आहे.

बाप्पाची मूर्ती थायलंड येथे रवाना झाली आहे. ही मूर्ती साडेचार फूटांची असून फायबरमध्ये बनविली आहे. निलेश पारसेकर यांनी ही मूर्ती बनविली आहे. तर मुखेडकर यांनी ही मूर्ती रंगवली आहे. नितीन करडे यांनी तांब्यावर सोन्याचा मुलामा देऊन मुकुट, परशू, कान, शुण्डाभूषण, गळ्यातील हार असे विविध दागिने बनविले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.