बारामती- कटफळ (ता. बारामती) येथील डॉ. गोविंद कांबळे व प्रतिभा कांबळे या दाम्पत्यास नुकतेच थायलंडमध्ये सन्मानित करण्यात आले. गेल्या काही वर्षात शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पहिल्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा आयोजित विश्व साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला.
खासदार अमर साबळे, पत्रकार डी. के. पंजामूर्ती, के. जी. बालकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. शुक्रवारी (दि. 8) व शनिवारी (दि. 9) थायलंडमधील पट्टाया येथे हे संमेलन झाले. गोविंद कांबळे हे सध्या सातारा येथे सहयोगी प्राध्यापक असून प्रतिभा कांबळे या उपशिक्षीका आहेत.