थायलंड बॅडमिंटन स्पर्धा : अश्‍विनी व सात्विकची मिश्र दुहेरीत विजयी सलामी

सायना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

बॅंकॉक – थायलंड येथे सुरु असलेल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटाच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या अव्वल मानांकित अश्‍विनी पोनाप्पा व सात्विक साईराज यांनी विजयी सलामी दिली. 

दरम्यान या स्पर्धेत सहभागी झालेली फुलराणी सायना नेहवाल हिला करोनाची बाधा झाल्याचे सकाळी सांगितले जात होते. मात्र, हे वृत्त खरे नसल्याचेही समोर आले असल्याने तिला करोनाची बाधा झाली आहे की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे भारतीय संघाला धक्का बसला असून आता एकेरीत महिला गटाची सर्व मदार ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्हि. सिंधू हिच्यावरच आहे. 

मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात अश्‍विनी व सात्विक जोडीने स्थानिक खेळाडू हाफिज फैजल व ग्लोरिया विद्‌जाजा यांच्यावर 21-11, 27-29, 21-16 अशी तीन गेममध्ये मात केली.

दरम्यान, सरावादरम्यान केलेल्या चाचणीत एच. एस प्रणोयलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. त्याच्याही स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

थायलंडमध्ये स्पर्धा खेळताना सायनाचा करोना चाचणीतील अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. एक आठवड्यापूर्वी सायनाने करोनावर मात करत सराव सुरु केला होता. करोनातून सावरल्यानंतर सायना कोर्टमध्ये परतली होती. स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या तिसऱ्या करोना चाचणीमध्ये मात्र, ती पुन्हा पॉझिटिव्ह ठरली आहे.

चाचणीदरम्यान श्रीकांत जखमी 

किदाम्बी श्रीकांत याची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या नाकातून रक्त आल्याने वैद्यकीय अधिकारी घाबरले. श्रीकांतने या चाचणी प्रक्रियेवर संताप व्यक्त केला आहे. अत्यंत बेजबाबदरपणे चाचणी घेतली जात असेल तर त्यावर बंधन आणले गेले पाहिजे व त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईदेखील झाली पाहिजे, अशी मागणी श्रीकांतने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.