नवी दिल्ली – राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा जम्मूमध्ये दाखल होत आहे. राहुल गांधींसोबत या यात्रेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सामील होणार आहेत. यासाठी राऊत जम्मूत दाखल झाले आहेत. यावेळी राऊत यांनी शिवसेना जम्मूमध्ये देखील विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले.
माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी जम्मूतील निवडणुकांबाबत भाष्य केले. एखाद्या पक्षाचा विरोध करण्याचा प्रश्न नाही,काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून देशातील महत्वाचा पक्ष आहे. लोक राहुल गांधींच्या नेतृत्वाला स्वीकारत असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेत चांगले वातावरण आहे यामुळे देशात देखील चांगला संदेश जात आहे असंही राऊत यावेळी म्हणाले.
देशात काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाल हे काँग्रेसचं चिन्ह नसून शिवसेनेचं आहे त्यामुळे मलाही भरून आलं होत अशा भावना यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. तसेच पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होणार असल्याचे देखील राऊत यांनी आईवेळी सांगितले.