Shiv Sena UBT : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला परभणी जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्षात खळबळ उडवून दिली आहे. (Shiv Sena UBT) माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या निर्णयाच्या निषेधार्थच आनेराव समर्थक पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राजीनामे सादर केले आहेत. (Shiv Sena UBT) मिळालेल्या माहितीनुसार, गंगाप्रसाद आनेराव हे शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या हटवण्याच्या निर्णयावरून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (Shiv Sena UBT) दरम्यान, आनेराव हे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता, अशी चर्चा आहे. राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, पुढील आठ दिवसांत निर्णय मागे घेतला नाही, तर ते पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतील. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, ते यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena UBT)