बुलडाणा – राज्यात आपले सरकार असले तरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शने करा असा सल्ला राष्ट्रवादीचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे मेळावा घेण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे सरकारला राष्ट्रवादीच्या मंत्र्यानेच घरचा आहेर दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीने घेतलेल्या या मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात संबोधित करताना चक्क राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शने करा असा अजब सल्ला दिला.
राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जरी आपलं सरकार असलं आणि आपल्या मना विरोधात काम होत असेल, तर आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलने करा.