मुंबई – राज्य सरकारकडून लाॅकडाऊनच्या नियमांत शिथीलता देण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनामागृहे, मल्टिप्लेक्स 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच योगा क्लासबाबत देखील ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स सह योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
पुणे : अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजप रस्त्यावर
मात्र, सिनेमाहाॅलमध्ये, नाट्यगृहांमध्ये फूड कोर्ट आणि फूड स्टाॅक करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शासनाकडून सांगण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, घ्यावी लागेल काळजी
दरम्यान, सरकारकडून अनेक नियमांमध्ये शिथीलता देण्यात येत आहे. लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढतो आहे. तसेच डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे.
पोलीसांनी मला मारलं – अर्णब गोस्वामी
लस येईपर्यंत मास्क हीच लस समजून मास्कचा काळजीपूर्वक वापर करावा, असे सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे.
आता केवळ मित्रमंडळी किंवा कुटुंबियांसंवेत चित्रपट पाहण्यासाठी करा अख्खे थिएटर बुक ! जाणून घ्या कसे..