विमानवाहू नौकेच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू

नवी दिल्ली – संपुर्ण भारतीय तंत्राने बनवल्या गेलेल्या विक्रांत या विमानवाहू नौकेच्या दुसऱ्या टप्प्यातील सागरी चाचण्यांना सुरूवात झाली आहे. ही नौका पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. सुमारे चाळीस हजार टन वजनाची ही विमानवाहू नौका भारताने तयार केलेली सर्वात मोठी नौका आहे.

या नौकेची पाच दिवसांची पहिली समुद्री सफर आणि चाचणी गेल्या ऑगस्ट महिन्यात पुर्ण झाली आहे. या नौकेवरील सर्व महत्वाच्या सिस्टीम या चाचणीत यशस्वीपणे कार्यरत झाल्याचे दिसून आले आहे असे नौदलाने म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी ही नौका रविवारी कोची बंदरातून रवाना झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.