टेस्टिंग, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवणार

पुणे-करोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने चाचणी आणि “कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग’चे प्रमाण वाढवणार असून, त्यासाठी अन्य यंत्रणांची मदत घेणार असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले. “जिनोम सिक्वेन्सिंग’ च्या चाचण्या सुरू असल्याने सध्या “एनआयव्ही’मार्फत होणाऱ्या “आरटी-पीसीआर’ चाचण्या बंद झाल्या आहेत.

त्यामुळे “नॅशनल एड रिसर्च इन्स्टिट्यूट’, “कमांड हॉस्पिटल’, “एएफएमसी’ या सर्वांशी बोलणे सुरू आहे. त्यांच्या मदतीने चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलल्याचे राव यांनी नमूद केले.

ससून रुग्णालयातही दर दिवशी एक हजार चाचण्या होऊ शकतात. यासाठी त्यांना लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्‍चरची उपलब्धता, अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. येत्या चार दिवसांत ती व्यवस्था करण्यात येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महसूल प्रशासनाकडून करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच यंत्रणा सक्रिय झाली आहे. करोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडून कठोर अंमलबजावणी सुरू आहे.

प्रवासात काळजी घ्या
आंतरजिल्हा दळणवळण बंद करण्यात येणार नाही. खासगी ट्रॅव्हलर्स कंपन्यांकडून सुरक्षेचे नियम पाळणे आवश्‍यक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. तोच उद्देश्‍य “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमामागे होती, असे राव म्हणाले.

कठोर पावले
जनजागृती आणि जनसंवाद वाढवणे महत्त्वाचे आहे. स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांच्या सहकार्याने ही जागृती केली जाणार आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात बाधितांची आकडेवारी वाढत आहे. आश्‍चर्यजनक वाढ तेथे होत आहे. त्याच्या अनुषंगाने कठोर पावले उचलल्याचे राव म्हणाले.

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर
मागील वेळी करोनाचे जे हॉटस्पॉट होते तेच आताही आहेत. मात्र, अन्य ठिकाणीही आता काही बाधित सापडत आहेत. या भागात कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामीण भागातही काही तालुके आहेत जेथे संख्या वाढत आहे, तेथेही कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.