गेल्या 24 तासांत 6 लाख नमुन्यांची चाचणी

नवी दिल्ली – भारतात गेल्या 24 तासात, सलग दुसऱ्या दिवशी देशात कोविडच्या, 6 लाखांहून जास्त चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासांत 6,19,652 चाचण्या करण्यात आल्या. त्याबरोबरच आज रोजी चाचण्यांची एकत्रित संख्या 2 कोटी 14 लाख 84 हजार 402 इतकी झाली आहे.

प्रती लक्ष चाचण्यांच्या संख्येत 15 हजार 568 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. “टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या दृष्टीकोनावर आधारित धोरणाअंतर्गत कोविड-19 च्या चाचणी प्रयोगशाळांचे निरंतर सक्षमीकरण करण्यात येत आहे. आज रोजी देशात 1,366 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 920 सरकारी तर 446 खाजगी प्रयोगशाळा आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.