नवी दिल्ली : “कोविड-19’च्या चाचणीसाठी चीनमधील कंपन्यांकडून आयात केलेली टेस्ट किट वापरू नयेत, अशी सूचना “आयसीएमआर’ने राज्य सरकारांना केली आहे. ही टेस्ट किट पुरवठादारांना परत पाठवली जाणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीत गुआंगझो वोंडफो बायोटेक आणि झुहाई लिव्हसन डायग्नोस्टिक्सच्या किटचे मूल्यांकन केले गेले. या किटच्या गुणवत्तेबाबत हमी दिली गेली होती. पण तरिही या किटच्या वापरानंतर मिळालेल्या निष्कर्शांमध्ये तफावत आढळली आहे. हे पाहता राज्यांना या किटचा वापर थांबविण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे.
काही किट मिळाल्यानंतर “आयसीएमआर’ने या किटची गुणवत्ता तपासणी केली आहे. वैज्ञानिक आकलनावर आधारित
कमी प्रतीच्या आढळल्याने या किटची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे, असे आरोग्य मंत्रालयानेही प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. “आयसीएमआर’ने या पैकी कोणत्याही किटची किंमत दिलेली नव्हती. सर्व किटची किंमत आगाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे भारत सरकारला या किटसाठी एक रुपयाही नुकसान झालेले नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. काही राज्यांनी केलेल्या चाचण्यांदरम्यान किटच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली होती. सरकारला रॅपिड टेस्ट किट पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत काही जण नफा कमावत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.