काबुल – काबूल शहरात काल दहशतवाद्यांनी 10 ठिकाणी केलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये किमान तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. उत्तर काबुलमध्ये एका सशस्त्र वाहनातून झलेल्या बॉम्ब हल्ल्यात दोन जण ठार झाले.
तर पूर्व काबुलमध्ये कार्त ए भागात झालेल्या एका रॉकेट हल्ल्यात एक सरकारी वकील मारला गेला, असे काबुल पोलिसांचे प्रवक्ते फेर्द्वास फरमर्झ यांनी सांगितले.
तालिबानने मात्र या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे म्हटले आहे. संघर्ष संपवण्यासाठी अफगाणिस्तान सरकार बरोबर आपली बोलणी सुरू असल्याने या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचा दावा तालिबानने केला आहे.
त्यामुळे इसिस या दहशतवादी संघटनेनेच हा हल्ला केल्याचा संशय आहे. यापूर्वीही पूर्व काबुलमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी इसिसने घेतली होती.