श्रीनगर – काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी आज ठार झाला. सोपोर शहराच्या रेबन भागात ही चकमक झाली. त्या भागात काही अतिरेकी आश्रयाला आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी पहाटे तेथे छापा मारला त्यावेळी ही चकमक झाली. त्यात तो ठार झाला.
त्याची ओळख अजून पटलेली नाही. त्याचे काही साथीदार नंतर फरारी झाले. त्या भागाची नाकेबंदी करून त्यांचा शोध घेतला जात आहे. बराच वेळ हे ऑपरेशन सुरू होते.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा