पंजाबातही दहशतवादी मोड्यूल उद्‌ध्वस्त

अमृतसर  – पंजाबमध्ये दहशतवादी कृत्ये करण्याचे एक मोड्यूल पंजाब पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले आहे. त्यात चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पंजाबमध्ये अतीसतर्कता पाळण्याचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दिले आहेत. पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा हा 40 दिवसांतील चौथा प्रयत्न होता.

पाकिस्तानात राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांसह पाकिस्तानी गुप्तचर खात्याच्या एका अधिकाऱ्याचा या प्रकरणातील सहभाग उघड झाला असून त्यांचाही समावेश या प्रकरणात आहे. या प्रकरणात यापुर्वी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी बुधवारी पोलिसांना दिली.

दहशतवादी घटनांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी राज्यात अतिसतर्कतेचा आदेश दिला आहे. अगामी विधानसभा निवडणुका, शाळा, शैक्षणिक संस्था खुल्या होण्याच्या पार्श्‍वभूमीवर हा सर्तकतेचा आदेश देण्यात आला होता.

या अटकेचा तपशील सांगताना पोलीस महासंचालक म्हणाले, पाकस्थीत संघटना आयएसवायएफचा प्रमुख लखबीर सिंग आणि कासिम, तसेच मोगा येथील लखबीरसिंग रोडे हे दहशतवादी मोड्यूलमागील सूत्रधार आहेत. तर रुबलसिंग, विकी भट्टी, मलकीतसिंग, गुरूप्रितसिंग यांना काल अटक करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.