दहशतवादी मसूद अजहर पाकिस्तानातच; खुद्द पाकची कबुली 

इस्लामाबाद – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानातच असल्याची कबुली खुद्द पाकिस्तानानेच दिली आहे. याआधी पाकिस्तानकडून मसूद अजहर आमच्या देशात नसल्याचा दावा केला जात होता. आता मात्र हा खोटारडेपणा उघड झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका मुलाखतीत ही कबुली दिली आहे.

शाह महमूद कुरेशी यांनी म्हंटले कि, आमच्याकडे असलेल्या सूचनेनुसार मसूद अजहर पाकिस्तानातच असून त्याला सध्या आजाराने ग्रासले आहे. तो घराबाहेरही पडू शकत नाही. पाकिस्तान मसूद अजरला अटक करणार का? असा प्रश्न विचारल्यावर कुरेशी म्हणाले, भारताने त्याच्या कृत्यांबाबत पुरावे द्यावेत. आम्ही कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी  जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. भारताकडून या हल्ल्याचे एक डॉजियरही सोपविला आहे. यामध्ये पुलवामा हल्ल्यासंबंधी सर्व पुरावे आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.