नवी दिल्ली – भारताने जम्मू-काश्मीर विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापतीत वाढ झाली आहे. देशात अशांतता आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न पाक सतत करत असताना दिसत आहे. त्यातच आता पाकच्या कमांडोसह दहशतवाद्यांनी सीमेवरुन देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु, त्यांचा हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे.
Army sources:This infiltration or attempted BAT action by Pakistan on 12-13 Sept 2019, was seen&eliminated in Hajipir Sector of PoK. Despite repeated denials,Pak has been trying to push terrorists into India. In Aug,Army managed to foil over 15 infiltration attempts by Pak on LoC https://t.co/UelRQpe9Vr
— ANI (@ANI) September 18, 2019
पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या लॉन्चिंग पॅडवरून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. 13 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने बॉर्डर एक्शन टास्क (बीएटी) ने अनेक घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी केले असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये बॉर्डर एक्शन टास्क (बीएटी) च्या घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) कमांडोवर आणि दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने ग्रेनेडने हल्ला केला आणि त्यांच्या प्रयत्नांना अयशस्वी केल्याचे दिसत आहे.