नेपाळमार्गे दहशतवाद्यांची घुसखोरी; अयोध्या निकालावर हल्ल्याचे सावट

नवी दिल्ली – देशात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. शेजारी देश नेपाळमार्गे सात दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहे. देशात मोठा हल्ला घडविणाच्या तयारीत दहशतवादी असल्याचे समजत आहे. या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही नेपाळमार्गे तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती.

अयोध्या प्रकरणी या महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. माहितीनुसार, घुसखोरी करणारे दहशतवादी देशात विविध ठिकाणी पसरले आहेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेश हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून दोन्ही राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सोशल मीडियावर अफवा पसरू नयेत यासाठी लक्ष ठेवले जात आहे. काशी, मथुरा यासह इतर धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.