नवी दिल्ली : काही दिवसापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर हा हल्ला करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सात जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपाचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्राल येथील बसस्थानकावरील एसएसबी जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला. मात्र, त्यांचा निशाणा चुकला आणि रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाला. ज्यामध्ये सात नागरिक जखमी झाले.
#UPDATE | Seven civilians have suffered minor injuries in grenade attack in Tral, Pulwama. Health condition of all the injured is stable: Jammu and Kashmir Police https://t.co/aR2LOouUuY
— ANI (@ANI) January 2, 2021
हल्ल्यानंतर तातडीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तर, जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अगोदर श्रीनगरमधील लावापोरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.