महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची निव्वळ अफवा 

बेंगळूरु – महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांनी पत्र लिहून सर्व राज्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, चौकशीवेळी हा निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. फोन करणारा ट्रक ड्रायव्हर असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक ड्रायव्हरचे नाव स्वामी नाथा पूरम असल्याचे कळते आहे.

कर्नाटकच्या पोलिसांना एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली होती. यामध्ये त्याने कर्नाटक, महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तामिळनाडूच्या रामनाथपूरममध्ये १९ दहशतवादी जमले असल्याचा दावाही त्याने केला होता. यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असलेल्या मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही माहिती देताना ट्रक चालकाने समुद्रतटावरील शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.