वेलिंगटन – न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात एका इस्लामिक दहशतवाद्याने सहा नागरिकांना चाकू हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला, पण सुरक्षा दलाने लगेच त्याला घेरून त्याचा खात्मा केला. त्याने केलेल्या हल्ल्यात जे तीन दुकानदार गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ल्याचाच प्रकार होता, असे पंतप्रधान जॅकिंडा आर्डेर्न यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, हल्लेखोर श्रीलंकेचा नागरिक असून तो इस्लामकि स्टेटच्या गटाशी संबंधित असावा असे समजले आहे. या इसमाविषयी आम्हाला आधीच माहिती समजली होती, पण कोणत्याही गुन्हाशिवाय त्याला कारागृहात टाकणे शक्य नव्हते.
न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी ऑकलंडच्या सुपरमार्केटमध्ये हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे हा इसम जेव्हा घरातून निघाला तो सुपरमार्केटमध्ये पोहोचेपर्यंत पोलीस त्याच्या मागावरच होते आणि त्याने हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर 60 सेकंदातच त्याचा खात्मा केला गेला.