नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या काही भागात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केला आहे.
सूत्रांनुसार, श्रीनगर आणि अवंतीपुरा येथील हवाईदलाच्या तळांवर हल्ला करून मोठा घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.
Government Sources: Intelligence input warns against terrorists’ plans to carry out an attack on Srinagar and Awantipora air bases. Security forces on high alert in and around these bases. pic.twitter.com/tQfCSGpmGB
— ANI (@ANI) May 17, 2019