भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हाच मुख्य मुद्दा

सय्यद अकबरुद्दीन यांनी संयुक्‍त राष्ट्रात भारताची भूमिका केली स्पष्ट

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत सुरूवातीपासूनच दहशतवादाच्या विरोधात असून भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हा मुख्य घटक असलयाचे अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले आहे. ते न्युयॉर्कमध्ये बोलत होते.

संयुक्‍त राष्ट्रांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत असताना अकबरुद्दीन यांनी “दहशतवाद हा भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रमुख घटक आहे कारण त्याचा परिणाम बाह्य घटकांपेक्षा आपल्या लोकांवर जास्त प्रमाणात होतो. दरम्यान, याच मुद्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठे यश यावर्षी मिळाले अहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रथमच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. दहशतवादाच्या प्रोत्साहनासाठी आमच्या शेजारील राष्ट्राकडून वारंवार कारवाया करण्यात येतात ते रोखण्यासाठी आम्ही जवळजवळ एक दशकापासून प्रयत्न करीत आहोत. त्यानंतर यावर्षी आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या मंजुरी समितीत मसूद अझरसारख्या जागतिक दहशतवाद्याची यादी करू शकलो.

अकबरुद्दीन पुढे म्हणाले, पंतप्रधान संयुक्त राष्ट्र संघात ‘इंटरनेट आणि सायबर स्पेसच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा तपशील आणि हिंसक अतिरेक्‍यांचा सामना करणे’. या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान, आम्ही प्रत्येक व्यासपीठावर दहशतवादाविरूद्ध लढा सुरू ठेवू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांबाबत अकबरुद्दीन म्हणाले की, दोन देशांमध्ये बरीच भरभराट झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात यंदाची चौथी बैठक आहे. ही तेजी भारत आणि अमेरिकेच्या संबंधातील वेगवान वाढीचे प्रतिबिंब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.