करतारपूर कॉरिडोरवर दहशतवादाचे सावट?

नवी दिल्ली – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. तर याठिकाणीच करतारपूर साहिब गुरुद्वारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके, शकरगड आणि नारोवाल याठिकाणी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ सक्रिय आहेत. येथे पुरुष आणि महिला दहशतवादी प्रशिक्षण घेत आहेत. इसखापूर आणि शकरगड येथे दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

दरम्यान, बहुप्रतिक्षित करतारपूर कॉरिडोरचे उद्‌घाटन पाकिस्तान 9 नोव्हेंबर रोजी करेल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी केली. करतारपूर प्रकल्पातील काम अंतिम टप्प्यात आहे आणि 9 नोव्हेंबर, 2019 रोजी सर्व लोकांसाठी खुले होणार आहे. हा कॉरिडॉर पाकिस्तानातील कर्तारपूरमधील दरबार साहिब आणि पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक मंदिराशी जोडेल. त्यामुळे भारतीय यात्रेकरूंना कर्तारपूरच्या यात्रेसाठी व्हिसामुक्‍त प्रवेश मिळू शकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.