टेरर फंडिंग प्रकरण: एनआयएकडून जम्मू काश्‍मीरमध्ये व्यापाऱ्यांच्या घरावर छापे

श्रीनगर : राष्ट्रीय तपास संस्थेने रविवारी सकाळी जम्मू काश्‍मीरमध्ये टेरर फंडिंग प्रकरणात चार ठिकाणी छापे मारले. एनआयएच्या टीमने उत्तरी काश्‍मीरमधील बारामुला जिल्ह्यातील चार व्यापारांच्या घरावर धाडी टाकल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएने फुटीरतावादी नेते सज्जान लोनचा सहकारी व्यापारी आसिफ लोन, तनवीर अहमद, तारीक अहमद आणि बिलाल भट यांच्या घरावर धाडी टाकल्या आहेत. त्यांच्या घरातून मिळणाऱ्या कागदपत्रांची तपासणी सध्या एनआयएकडून सुरु असल्याचेही म्हटले जात आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नियंत्रण रेषेपलीकडे व्यापार करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या घरावरदेखील छापे टाकले होते. हे छापे पुलवामा आणि श्रीनगर जिल्ह्यात टाकण्यात आले होते. जम्मू काश्‍मीर पोलिसांच्या मदतीने एनआयएने पुलवामा जिल्ह्यातील गुलाम अहमद वानीच्या घरावर धाडी टाकल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रशासन आणि एलओसीवर व्यापार 14 फेब्रुवारी 2019 ला रद्द करण्याआधी वानी त्यात सहभागी होता. एनआयएच्या सूत्रांनूसार एका अन्य छापेमारी श्रीनगरमधील परिमपोरा येथील फळ बाजारात केली गेली. ही छापेमारी एनआयएकडून टेरर फंडिगच्या चौकशीसाठी केली गेली. एनआयएने आतापर्यंत काश्‍मीरमधील प्रसिद्ध उद्योगपती जहूर वटाली आणि अनेक फुटिरतावादी नेत्यांना याआधीच अटक केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)