पुणे : धायरी भागात जुन्या वदातून टोळक्याने तरुणावर शस्त्राने वार केले. यावेळी टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. या हल्लयात गजानन राठोड (रा. धायरी) जखमी झाले असून त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राठोड धायरीतील चव्हाण आळीतून जात होते. त्यावेळी टोळक्याने त्याला अडवले. त्यातीतील एका आरोपीशी राठोडची भांडणे झाली होती. त्याच वादातून टोळक्याने राठोडवर हल्ला चढविला. त्याच्यावर कोयत्याने वार केले. परिसरातील दुचाकींची तोडफोड करुन टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.