चेन्नई – सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान क्रेन कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातावेळी कमल हसनही सेटवर उपस्थित होते. ते सुखरूप आहेत.
#UPDATE Chennai: Madhu (Personal Assistant to Director Shankar), Krishna (Assistant Director) and a staffer Chandran, have lost their lives in the incident. https://t.co/VpjDmRd9pU
— ANI (@ANI) February 19, 2020
माहितीनुसार, इंडियन २ या चित्रपटाचे शूटिंग चेन्नईजवळ ईव्हीपी एस्टेट स्पॉटवर सुरू होते. क्रेनमधून मोठ्या वजनाच्या वस्तू हलविण्यात येत होत्या. यावेळी या वस्तू तुटून खाली कोसळल्या. याखाली दबून तिघांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये दिग्दर्शक शंकर पर्सनल दिग्दर्शक मधु (२९ वर्ष), सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा (३४ वर्ष) आणि एक कर्मचारी चंद्रन (६० वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. रात्री 9.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. कमल हसन यांनी ट्विट करत या अपघाताबाबत दुख व्यक्त केलं आहे.
மருத்துவமனையில் விபத்தில் சிக்கியவர்களை பார்த்து மருத்துவர்களிடம் பேசியுள்ளேன்.
முதலுதவி வழங்கப்பட்டு உரிய சிகிச்சைக்கான வேலைகள் நடக்கிறது.
இவர்கள் விரைவாக உடல் நலம் பெற்றிடுவார்கள் என்ற நம்பிக்கையுடனே இந்த இரவு விடியட்டும்.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 19, 2020