संगमनेर : मलकापूर येथील युटेक शुगर कारखान्यातील स्टोअर रूमला भीषण आग लागली. शॉर्ट शर्कीटने लागलेल्या आगीत कारखान्यातील साहित्य जाळून खाक झाले आहेत. या भीषण लागलेल्या आगीमुळे कारखाण्याचे अंदाजे ३५ कोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेली माहिती अशी कि, शनिवारी सकाळी पहाटे तीन वाजल्याचा सुमारास साखर गोडाऊनमध्ये भीषण आग लागली. पॅनलबोर्डमध्ये शॉर्ट शर्कीटमुळे आग लागली.
स्टोअरमधील कॉम्पूटर्स, लॉपटॉप, लहान-मोठया बेरींगस, मोटरी, ऑईलस् बॉलर, मशिनरी लाखो रुपये किंमतीचे साहित्य व कागदपत्रे तसेच साखर गोडावूनमधील 92 हजार 560 किंटल साखर जाळून खाक झाली आहे.
सुरक्षा रक्षकांनी घटनेची माहिती तात्काळ जनरल मॅनेजर अशोक वाघ यांना दिली . वाघ यांनी तात्काळ सहकार महर्षी थोरात व डॉ. विखे पाटील कारखान्याच्या आणि देवराळी प्रवरा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले, जनरल मॅनेजर अशोक वाघ, मंडलिक, डहाळे, इलेक्ट्रीक आधिकारी, इन्शुरेनस आधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.