कोप्पल: भारतात आज सर्वांना समान संधी मिळत असली तरी दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी कुप्रथा आणि भेदभाव दिसून येतो अनेकदा या कुप्रथांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर येते. तर काही ठिकाणी आजही मंदिरात प्रवेश केल्यामुळे दलित लोकांना दंड आकारल्याचा घटना समोर येतात.
अशीच एक घटना कर्नाटकातल्या हनुमासागरजवळ असलेल्या मियापुरा गावात घडली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, मुलाचा वाढदिवस असल्यानं त्याचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले होते. यावेळी उत्साहात असलेला त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मंदिराच्या आत धावत गेला. थोड्याच वेळात तो देवाला नमस्कार करून बाहेर आला. तेव्हा चिमुरडा हनुमान मंदिरात गेल्यानं त्याच्या पालकांना २३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मंदिरातील उच्च जातीच्या व्यक्तींनीदलित मुलाच्या प्रवेशामुळे मंदिर अपवित्र झाल्याचा दावा करत हा दंड ठोठावला.या रकमेचा वापर मंदिराच्या शुद्धीकरणासाठी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे महसूल, समाज-कल्याण विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी पोहोचले. पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी उच्च जातीच्या सदस्यांना दिला.