मुंबई : बुलढाण्यातील मेहकरजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात तिघांचाजागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातात आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर महामार्गावर मेहकर शहरानजीक असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ अल्टो कार व लक्झरी बसमध्ये अपघात झाला आहे.
या अपघातात इंदल चव्हाण , योगेश विसपुते, विशाल विसपुते असे मृत्युमुखी पडलेल्यांची नवे आहेत. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.गंभीर जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
अपघाता दरम्यान, कार ही लक्झरी बसमध्ये अडकली होती. त्यामुळे कारमधील जखमींना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्याने तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन्ही गंभीर जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील पाच जण हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील आहेत. लक्झरी बस पुण्याहून नागपूरकडे जात होती तर कार नागपूरकडून मेहकरकडे येत असताना भल्या पहाटे हा अपघात घडला. अपघातानंतर तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.