कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात

गायमुखवाडीजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ओतूर(पुणे)- नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्‍यातील गायमुखवाडीजवळ सोमवारी (दि. 14) रात्री चारचाकी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

एकनाथ बबन गवांदे (वय 36) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. नगर-कल्याण महामार्गावर गायमुखवाडी (ता. जुन्नर) नजिक असणाऱ्या वळणावर महिंद्रा बोलेरो गाडी (एमएच 12 जेयू 6796) ही नगर बाजूकडे जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकीला (एमएच 14 ईटी 3253) जोरदार धडक दिली. यात एकनाथ गवांदे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत चिंतामण सिताराम घोलप यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बोलेरो चालक विश्वास भानुदास गागरे (वय 30, रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर) याच्यावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक मुकुंद मोरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.