पुणे – पुणे-बेंगलोर महामार्गावर ६ ते ७ वाहनांचा मोठा अपघात झाला आहे. पहाटे ३ वाजता स्वामी नारायण मंदिरजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती समजताच पुणे अग्निशामक दल आणि पीएमआरडीएचे अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी ही वाहने बाजूला करुन जखमींना रुग्णालयात दाखल केले.