नांदेड – नांदेडमधून दु:खत घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात नांदेड येथील महंत त्यागीनंद महाराज यांच्यासह अन्य् दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनाला जात असताना मध्य प्रदेशातील कटनी या ठिकाणी कारने बांबू घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर पुणेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महंत त्यागीनंद महाराज, वय 52, बळीराम विक्रम पूयड, वय 48 दत्ता नागोराव पूयड, बालाजी जाधव, माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतन कुमार आणि कारचालक संभाजी बालाजी जाधव यांचा समावेश होता. हे सर्व उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनासाठी जात होते. या अपघाताची माहिती मिळताच पुणेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.