पॅरिस – सध्या युक्रेनच्या सीमेवर रशियन फौजांनी आपली कुमक वाढवली असून लष्करी हालचालींना वेग आला आहे. तर, नॉर्वेमध्ये अमेरिकन बॉम्बर्स दाखल झाले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशियाने नौदलाच्या उत्तर आरमार तैनात केले आहे.
युरोपमध्ये युद्ध होण्याची भीती व्यक्त होत असताना दुसरीकडे फ्रान्सने आपली युद्ध तयारी जोरात सुरू केली आहे. बुधवारी फ्रान्सच्या हवाई दलातील राफेल आणि मिराज या लढाऊ विमानांनी युद्ध सराव केला. या युद्ध सरावानुसार, त्यांनी अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रे डागत शक्तिप्रदर्शन केले.
फ्रान्सच्या हवाई दलाने हा युद्ध सराव केला. फ्रान्स दरवर्षी आपल्या अणवस्त्र हल्ल्याच्या क्षमतेच्या चाचणीसाठी ‘ऑपरेशन पोकर’ राबवते. यामध्ये चार वेळेस युद्धसराव सुरू असतो. हा युद्ध सराव बहुतांशी वेळा रात्रीच्या वेळी होतो. यामध्ये फ्रान्सचे हवाई दल आपल्यावर झालेल्या अणवस्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सेकेंड स्ट्राइक कॅपिबिलिटीची चाचणी घेते.
फ्रान्सच्या हवाई दलाने सांगितले की, बुधवारी रात्री झालेल्या या युद्ध सरावात लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. यामध्ये राफेल, डब्लूसी- आणि ए एमआरटीटी विमानांशिवाय अवाक्स ई- आणि मिराज- लढाऊ विमाने सहभागी झाली होती.
ही मोहीम पाच ते सहा तास चालली. यामध्ये लढाऊ विमानांनी भूमध्य सागरावरून उड्डाण करत मध्य फ्रान्समध्ये असणाऱ्या चाचणीच्या ठिकाणावर क्षेपणास्त्र डागली. या दरम्यान काही लढाऊ विमानांनी शत्रूंच्या विमानांची भूमिका बजावली.