जामीयाजवळ निदर्शकांवर हल्लेखोरांकडून गोळीबार, परिसरात तणाव

नवी दिल्ली : ये लो आझादी म्हणत एका हल्लेखोराने जामिया विद्यापीठाजवळ सुधारीत नागरिकत्व कायद्या (का) कायद्याविरोधातील निदर्शकांवर गोळीबार केला. त्यानंतर त्या भागात तणाव पसरला असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर तेथे व्यापक निदर्शने करण्यात आली. संतप्त नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडले. जमावाचा पोलिसांशी संघर्ष सुरू झाला.

या हल्लेखोराची ओळख पटली आहे. तो स्वत:ला रामभक्त म्हणवून घेत असून त्याचे नाव गोपाल शर्मा आहे. त्याला पोलिसांनी पकडले असून त्याला कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण नाट्याने या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले. फिक्‍या रंगाची पॅन्ट घालून आणि गडद रंगाचे जाकीट घातलेला माणूस बंदूक घेऊन पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावल्याने रिकाम्या असणारत्या रस्त्यावर ये लो आझादी आझादी म्हणत रिव्हॉलव्हर दाखवत फिरत असल्याचे दिसत आहे.

या बंदूकधाऱ्याने गोळी झाडण्यापुर्वी फेसबुक लाईव्ह केले होते. पोलिस म्हणाले, ते हल्लेखोराच्या खऱ्या नावाची खातरजमा करत आहेत. या हल्ल्यापुर्वीच त्याने फेसबुकवर शाहीनबाग खेल खतम असा संदेश दिला होता. माझ्या अंतीम प्रवासात मला भगव्या वस्रात गुंडाळा आणि जय श्रीरामच्या घोषणा द्या अशीही पोस्ट त्याने केली आहे.

गांधी पुण्यातिथीच्या दिवशी सुरू असणारा मोर्चा कसा रक्तलांछीत झाला याची आठवण अनेक विद्यार्थी मांडत आहे. “”पोलिसांनी बॅरिकेड लावलेल्या होली फॅमिली हॉस्पिटलच्या दिशेने जात होतो, त्यावेळी अचानक रिव्हॉलव्हर घेतलेला तरूण तेथे आला. त्याने गोळीबार केला. एक गोळी माझ्या मित्राच्या हातात घुसली”, असे आमन असिफ या जामियातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने सांगितले.
तिचा मित्र शाबद फारूक हा मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. तो हल्लेखोराला शांत करण्याचा प्रयत्नात असताना त्याने गोळी झाडली त्यात तो जखमी झाला. फारूक हा काश्‍मिरी असून त्याला एम्स रूग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.