नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 41 हजार 157 कोविड रूग्ण आढळून आले आहेत. गेले काही दिवस ही संख्या 40 हजारांच्या आत असायची पण आता मात्र पुन्हा ही संख्या चाळीस हजारांच्या पुढे गेली आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत कोविडचे 518 रूग्ण दगावल्याने मृतांची एकूण संख्या 4 लाख 13 हजार 609 इतकी झाली आहे. देशातील सध्याचे सक्रिय करोना बाधित आता 4 लाख 22 हजार 660 इतकी झाली असून ऍक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण आता 1.36 टक्के इतके झाले आहे.
आत्तापर्यंत करोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 3 कोटी 26 लाख 9 हजार 796 इतकी झाली आहे. देशातील लसीकरणाच्या संख्यने आता 40 कोटींचा टप्पा गाठला असून लसीकरण झालेल्यांची संख्या आता 40 कोटी 49 लाख इतकी झाली आहे.