मनन अग्रवाल, क्षितिज अमीन, वरद उंडरे यांची आगेकूच

पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात मनन अगरवाल, क्षितीज अमीन, विहान तिवारी, देवांक उंडरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लब, कोथरूड येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित मनन अगरवाल याने ऋत्विज देशपांडेचा 5-0 असा तर, क्षितीज अमीनने अर्यमान दहियाचा 5-1 असा सहज पराभव केला. देवांक उंडरे याने अर्चित केळकरवर 5-3 असा विजय मिळवला. विहान तिवारीने राघव सरोदेला 5-2 असे नमविले.

सविस्तर निकाल :

10 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी : मनन अगरवाल(1) वि.वि.ऋत्विज देशपांडे 5-0, क्षितीज अमीन वि.वि.अर्यमान दहिया 5-1, वेद मोघे वि.वि.अभिर बारपांडे 5-0, विहान तिवारी वि.वि.राघव सरोदे 5-2, अर्जुन वेल्लूरी वि.वि.अचिंत्य कुमार 5-0, देवांक उंडरे वि.वि.अर्चित केळकर 5-3.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×