प्रियांश प्रजापतीचा मानांकित खेळाडूवर विजय

चौथी पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धा

पुणे – 14 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रियांश प्रजापती याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत येथे होत असलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज स्पर्धेत आगेकूच नोंदवली.

मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रियांश प्रजापतीने दहाव्या मानांकित मानस गुप्ताचा 6-1 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. विष्णू वाघेरेने आदित्य आडतेवर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला.

अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकर व दुसऱ्या मानांकित ईशान देगमवार यांनी अनुक्रमे शिवम बासू व नचिकेत गोरे यांचा 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून तिसरी फेरी गाठली. मुलींच्या गटात सानिका लुकतुके हिने तेजस्विनी श्रीफुलेचा 6-1 असा तर, अलिना शेखने माही ग्यानचा 6-0 असा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल –

दुसरी फेरी : 14 वर्षाखालील मुले – अर्जुन अभ्यंकर(1) वि.वि. शिवम बासू 6-0, शारंग कसाळकर वि.वि. शंतनू छाप्रिया 6-4, विष्णू वाघेरे वि.वि. आदित्य आडते 6-5(5), सार्थ बनसोडे(4) वि.वि. शिवम गायकवाड 6-0, ईशान देगमवार(2) वि.वि. नचिकेत गोरे 6-0, शौर्य राडे वि.वि. राजवीर पडाळे 6-1, अर्जुन प्रधान वि.वि. साईराज साळुंके 6-3, प्रियांश प्रजापती वि.वि. मानस गुप्ता(10) 6-1.

14 वर्षाखालील मुली : पहिली फेरी – सानिका लुकतुके वि.वि. तेजस्विनी श्रीफुले 6-1, अलिना शेख वि.वि. माही ग्यान 6-0, श्रुती नानजकर(4) वि.वि. रितिका मोरे 6-2, काव्या कृष्णन(6) वि.वि. नैशा कपूर 6-0, अणिका शहा वि.वि.नाव्या भामिदिप्ती 6-0.

Leave A Reply

Your email address will not be published.