पाचगणी – एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेला आजपासून (20 एप्रिल) सुरूवात होणार असून या स्पर्धेत देशभरातील 150 हुन अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. हि स्पर्धा पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे दि. 20 ते 26 एप्रिल या कालावधीत रंगणार आहे.
रवाईन हॉटेल यांच्या तर्फे गेली 11 वर्षे अनेक टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धादेखील याचाच एक भाग आहे. पाचगणी येथील सुंदर व्हॅलीच्या ठिकाणी असलेल्या रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा होत आहे.हि स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुली एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे.