जोशुवा जॉन इपेन याचा मानांकीत खेळाडूला धक्का

14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा :

पाचगणी – रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत जोशुवा जॉन इपेन याने दिल्लीच्या पाचव्या मानांकीत ओमांश सहारीया याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत आश्‍चर्यकारक निकालाची नोंद केली.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत मानस धामनेने आपला राज्यबंधु अर्जून अभ्यंकर याचा 6-2, 6-1 असा पराभव करत आगेकुच केली. कर्नाटकच्या सहाव्या मानांकीत अदिथ अमरनाथ याने कर्नाटकच्याच वेद मुदकावी याचा 6-3, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. तिस-या मानांकीत तमिळनाडूच्या प्रणव रेथिन याने दिल्लीच्या पराग जैनचा 6-4, 5-7, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. आसामच्या सातव्या मानांकीत जिग्याशमान हजारीकाने गुजरातच्या अथर्व पटेलचा 6-3, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

तर, महाराष्ट्राच्या आर्यन हुडने तेलंगणाच्या प्रणित भाटीयाचा 6-4, 6-0ने पराभव केला. तर, निल जोगळेकरने तेलंगणाच्या वेंकट कुमार रेड्डी याच 6-0, 6-1 असा पराभव करत आगेकूच केली. ईशान देगमवारने महाराष्ट्राच्याच तनिष्क जाधवचा 6-0, 6-1 ने पराभव केला. अयान गिरधर याने मध्य प्रदाशच्या मनवर्धन राखेचा याचा 6-2, 7-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×