टेनिस स्पर्धा : अथर्व, अनन्या, मृणाल यांची आगेकूच

फिनआयक्‍यू करंडक 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धा

पुणे -नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्‍यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अथर्व येलभर याने तर, मुलींच्या गटात अनन्या दलाल, मृणाल शेळके या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्‍का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मेट्रोसिटी स्पोर्टस क्‍लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात दहाव्या मानांकित अनन्या दलाल हिने सातव्या मानांकित अद्विता गुप्तावर 6-3 असा विजय मिळवला. बिगरमानांकीत मृणाल शेळके हिने तेराव्या मानांकित ईमान वीरजीचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. दुसऱ्या मानांकित मेहक कपूर हिने आरोही देशमुखवर 6-0 असा विजय मिळवला. सहाव्या मानांकित ह्रितिका कापले हिने नवव्या मानांकित वसुंधरा भोसलेला 6-3 असे नमविले.

मुलांच्या गटात बिगरमानांकीत अथर्व येलभर याने चौथ्या मानांकित सक्षम भन्साळीचा 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित दिवीज पाटील याने राम मगदूमचे आव्हान 6-3 असे मोडीत काढले. नील केळकरने नमिश हूडचा 6-2 असा, तर पाचव्या मानांकित अयान शेट्टीने अर्जुन वेलुरीचा 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

तसेच अन्य सामन्यात तिसऱ्या मननांकित ओम वर्माने शार्दुल खवलेचा 6-1 असा पराभव करत आगेकूच केली. तर, आयुष पुजारीने शिवराज जाधवचा 6-3 असा पराभव करुन आगेकूच केली. तर, अखेरच्या सामन्यात दुसरे मानांकन असणाऱ्या द्रोण सुरेशने बिगरमानांकित वैष्णव रानवडेचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल:

10 वर्षाखालील मुली : उप-उपांत्यपूर्व फेरी: रित्सा कोंडकर वि.वि.स्नेहा आगलावे 6-1, अनन्या दलाल(10) वि.वि.अद्विता गुप्ता(7) 6-3, प्रिशा शिंदे(3) वि.वि.दिया अगरवाल 6-0, काव्या देशमुख पुढे चाल वि.ईश्‍वरी कवठेकर, ह्रितिका कापले(6) वि.वि.वसुंधरा भोसले(9) 6-3, मृणाल शेळके वि.वि.ईमान वीरजी(13) 6-0, वरंदिका राजपूत(5) वि.वि.सिद्धी मिश्रा 6-0, मेहक कपूर(2) वि.वि.आरोही देशमुख 6-0.

10 वर्षाखालील मुले : दिवीज पाटील(1) वि.वि.राम मगदूम 6-3, नील केळकर वि.वि.नमिश हूड 6-2, अथर्व येलभर वि.वि.सक्षम भन्साळी (4) 6-2, शौनक सुवर्णा(10)वि.वि.श्रीराम जोशी 6-1, अयान शेट्टी(5) वि.वि.अर्जुन वेलुरी 6-1, ओम वर्मा(3) वि.वि.शार्दूल खवले(13) 6-1, आयुष पुजारी(7) वि.वि.शिवराज जाधव 6-3, द्रोण सुरेश(2) वि.वि.वैष्णव रानवडे 6-3.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.