पुणे – वेदांग काळे, अथर्व जोशी, रोहन बोर्डे, राघव सरोदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे होत असलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत आगेकूच केली.
पहिल्या फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात वेदांग काळे याने अधिराज घुगेचा 6-0 असा तर अथर्व जोशीने वेदांग चड्डाचा 6-2 असा सहज पराभव केला. श्रीराम जोशीने वरद उंद्रेवर 6-1 असा विजय मिळवला.