राधिका महाजन, सोनल पाटील, ईशीता जाधव,रुमा गायकैवारी यांची आगेकुच

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धा

पाचगणी – मुलींच्या गटात माहाराष्ट्राच्या राधिका महाजन, सोनल पाटील, ईशीता जाधव, रुमा गायकैवारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे होत असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आगेकुच केली.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात दुस-या फेरीत महाराष्ट्राच्या राधिका महाजनने महाराष्ट्राच्याच संजीवनी कुतवळचा 6-1, 6-1 असा तर सोनल पाटीलने तेलंगणाच्या आर्नी रेड्डीचा 4-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. महाराष्ट्राच्या ईशीता जाधवने महाराष्ट्राच्याच खुशी शर्माचा 7-5, 6-1 असा तर रुमा गायकैवारीने परी चव्हाणचा 6-1, 6-3 पराभव केला.

सविस्तर निकाल- 

दुसरी फेरी – 16 वर्षाखालील मुली  :

राधिका महाजन(महाराष्ट्र) वि.वि संजीवनी कुतवळ(महाराष्ट्र) 6-1, 6-1, सोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि. आर्नी रेड्डी(तेलंगणा) 4-6, 6-2, 6-3, अमिशी शुक्‍ला(मध्यप्रदेश)वि.वि. रचिता तलवार (दिल्ली) 7-5, 6-3, सुर्यांशी तन्वर (हरियाणा) वि.वि जिया परेरा (महाराष्ट्र) 6-0, 6-2, ईशीता जाधव(महाराष्ट्र) वि.वि खुशी शर्मा (महाराष्ट्र) 7-5, 6-1, अभया वेमुरी(तेलंगणा) वि.वि रिया भोसले(महाराष्ट्र) 4-6, 6-1, 6-1, रुमा गायकैवारी(महाराष्ट्र)वि.वि. परी चव्हाण(महाराष्ट्र) 6-1, 6-3, मेखला मन्ना(पश्‍चिम बंगाल) वि.वि दिपशिका श्रीराम(कर्नाटक) 6-1, 6-2, अपुर्वा वेमुरी(तेलंगणा) वि.वि परिथ्रा नरेम(आंध्र प्रदेश) 6-3, 6-1.

Leave A Reply

Your email address will not be published.