ब्यूनस आयर्स – भारताचा आघाडीचा युवा टेनिसपटू सुमित नागल याचे अर्जेंटिना ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला स्पेनच्या रामोस विनोलास याच्याकडून पराभव पत्करावा लागला. या संघर्षपूर्ण सामन्यात रामोसने सलग दोन सेट जिंकत विजय नोंदविला.
2 तास 25 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सुमितने दमदार सुरुवात करत पहिला सेट 6-4 असा जिंकला. परंतु रामोसने सामन्यात वापसी करत 6-2 असा दुसरा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर सुमितला साजेशा खेळ करता न आल्याने रामोसने निर्णायक आणि तिसरा सेट 7-5 असा जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, नागलने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानी असलेल्या ख्रिश्चियन गरिंटोचा पराभव केला होता. या विजयासह त्याने जागतिक क्रमवारीतील टॉप-50 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. नागलने ख्रिश्चियनवर 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळविला होता.