किर्तने, डॉ. माधव घाटे, मयुर वसंत, योगेश शहा यांना दुहेरी मुकूट !

सोलारीस-जीआयएसटीए वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

पुणे – सोलारीस क्‍लब तर्फे आयोजित सोलारीस-जीआयएसटीए वरिष्ठ पुरूष आणि महिला राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नितीन किर्तने व डॉ. माधव घाटे आणि मुंबईच्या मयुर वसंत, अहमदाबादच्या योगेश शहा यांनी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये विजेतेपद मिळवत दुहेरी मुकूट संपादन केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोलारीस क्‍लब, मयुर कॉलनी येथे झालेल्या या स्पर्धेत 45 वर्षावरील गटामध्ये डेव्हिस कप खेळाडू नितीन किर्तने याने अजय कामत याचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. या गटात दुहेरीमध्ये नितीनने अजय कामतच्या साथीमध्ये खेळताना सुनिल लुल्ला आणि अजित सैल या जोडीचा 6-2, 6-3 असा सहज पराभव करून एकेरी आणि दुहेरीत विजेतेपद मिळवताना दुहेरी मुकूट पटकावला.

55 वर्षावरील गटामध्ये मुंबईच्या मयुर वसंत याने हिने पुण्याच्या जयंत पवार याचा 6-0, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीच्या गटात मयुर याने मेहेर प्रकाशच्या साथीत जयंत पवार व संजय कामत 6-1, 6-0 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. 60 वर्षावरील गटात अहमदाबादच्या योगेश शहा याने पुण्याच्या रविंद्र नगरकर याचा 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

योगेशने अजय लखोटीया हिच्या साथीत एम. सुरेश व एम. फर्नांडिस या जोडीचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले. 65 वर्षावरील गटात पुण्याच्या डॉ. माधव घाटे मुंबईच्या डी.एस. रामाराव याचा 6-3, 6-2 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीमध्ये डॉ.माधव घाटे याने व्हीएलएसएन राजू याच्या साथीत धवल पटेल व इ.किणीकर या जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

35 वर्षावरील गटामध्ये पुण्याच्या रविंद्र पांड्ये पुण्यातील मंदार वाकणकर याचा 4-6, 6-4, 10-7 असा सुपर टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 70 वर्षावरील गटात पुण्याच्या प्रविण महाजन यांनी पुण्याच्या शाम गायकवाड याचा 7-5, 2-6, 10-7 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण बॅडमिंटनपटू निखील कानिटकर आणि सोलारीसचे जयंत पवार, क्‍लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते झाले. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)