पुणे – आयकॉन ग्रुप, पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत टेनिसनट्स, महाराष्ट्र मंडळ, लॉ कॉलेज लायन्स, पीवायसी डायमंडस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत फेरीत उपांत्यपूर्व फेरीत लॉ कॉलेज लायन्स संघाने एमडब्लूटीए 1 संघाचा 14-11 असा, पीवायसी डायमंड्स संघाने डेक्कन गोल्डन बॉईज संघावर 14-13 असा निसटता विजय मिळवला.
टेनिसनट्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत एमडब्लूटीए 2 संघाचा 18-5 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्र मंडळ संघाने मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन संघाचा 16-10 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.